West Bengal Election Result : बंगालमध्ये ‘पोरिबोर्तन’ का घडलं? भाजपचा विजय, दीदींचा पराभव… नेमकी कारणं काय?

श्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकीत दोन्ही टप्प्यांमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसवर स्पष्ट वर्चस्व गाजवले आहे.

West Bengal Election Result : बंगालमध्ये ‘पोरिबोर्तन’ का घडलं? भाजपचा विजय, दीदींचा पराभव… नेमकी कारणं काय?

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. गेली 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा भाजपने पराभव केला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक विजय प्राप्त होताना दिसत आहे. दीदी’ विरुद्ध ‘मोदी’ अशा रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत अखेर मतदारांनी भाजपकडे वजन झुकले आहे.  पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकीत दोन्ही टप्प्यांमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसवर स्पष्ट वर्चस्व गाजवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दुसऱ्या टप्प्यात झालेल्या विक्रमी 91.66 मतदानाने निकाल पूर्णपणे फिरवला आहे.

पण इतकी वर्ष सत्तेत असलेल्या ममता दीदींना मतदारराजाने का नाकारलं? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे.  त्याची नेमकी काय कारणं असावीत याबद्दल थोडक्यात आढावा घेतला जात आहे.  

ममता बॅनर्जींच्या पराभवाचे संभाव्य मुद्दे पुढीलप्रमाणे
1. महिला, तरुणांचा
कल भाजपाकडे

2. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 
अधिक मतदान 

3. बांगलादेशी घुसखोरांचा
मुद्दा भाजपनं लावून धरला

4. महिला, तरुणांसाठी 
रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा 

5. भाजपानं निवडणुकीचं 
तंत्र बदललं 

6. उमेदवार निवडीतल्या 
चुका भाजपानं टाळल्या

7. भाजपनं निवडणूक अस्मितेच्या 
मुद्द्यावर जाऊ दिली नाही 

8. महिला अत्याचारामुळे 
ममतांना नुकसान 

9. ममतांकडून 
15 वर्षांत अपेक्षाभंग 

10. ममतांचा हट्टीपणा 
तरुणांना नापसंत 

11. मुस्लिमांचं तुष्टीकरण 
भोवलं

12. बेरोजगारी, उद्योग आणि
गुंतवणुकीचा अभाव

13. शिक्षक भरती प्रक्रियेत
तृणमूल नेत्यांकडून 
मोठा घोटाळा 

14. आर.जी.कर रुग्णालयात 
तरुणीवर पाशवी अत्याचार,
आरोपी तृणमूलचा नेता 

15. मतदार यादी शुद्धीकरणामुळे
लाखो बोगस मतदार बाद

16. अति आत्मविश्वास,
अहंकारी वागणं-बोलणं

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number