पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली बघायला मिळत आहे. गेल्या 15 वर्षांपासून असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला धक्का बसला आहे. भाजप आणि तृणमूल काँगेसमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या मतदारसंघात झारमुरी खाल्ली त्या मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे.
जेव्हा बंगालमध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी गेले होते तेव्हा त्याचवेळी त्यांनी अचानक एका दुकानात वळून झालमुरी या पदार्थाचा आस्वाद घेतला.हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओला मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. इंस्टाग्रामवरुन वेगाने व्हायरल झालेल्या या व्हिडीओला 24 तासाच्या आत 100 मिलियन ( 10 कोटी ) व्ह्यूज मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिथे झालमुरी खाल्ली तिथे भाजपने 123 जागांवर आघाडीवर असून टीएमसीने 109 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना चांगलाच धक्का बसला आहे. याचबरोबर भाजप पुन्हा एकदा इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे.