गुलाब देत परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे स्वागत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पुण्यात अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब देत स्वागत करण्यात आले. परीक्षेच्या एक तास आधीच मुलांनी परीक्षा केंद्रावर उपस्थिती लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा होत असल्यामुळे परीक्षा केंद्रावर योग्य तयारी करण्यात आली आहे. परीक्षेच्या केंद्रातून वाढ करण्यात आली असून […]

गुलाब देत परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे स्वागत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पुण्यात अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब देत स्वागत करण्यात आले. परीक्षेच्या एक तास आधीच मुलांनी परीक्षा केंद्रावर उपस्थिती लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा होत असल्यामुळे परीक्षा केंद्रावर योग्य तयारी करण्यात आली आहे. परीक्षेच्या केंद्रातून वाढ करण्यात आली असून परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, विशेष महिला पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बारावीची परीक्षा लेखी पद्धतीने घेण्यात येण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.

कोरोना काळानंतर दोन वर्षांनी आजपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार असून एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून आरोग्याच्यादृष्टीने योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर महाविद्यालय सज्ज झाले असून परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number