Weather Update : कोकणासह मुंबई-ठाण्यात 48 तासांसाठी अलर्ट; हवामान विभागाकडून नागरिकांसाठी खास आवाहन

राज्यात आज ताही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचे चटके बसणार आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याचा इशारा दिला आहे.

Weather Update : कोकणासह मुंबई-ठाण्यात 48 तासांसाठी अलर्ट; हवामान विभागाकडून नागरिकांसाठी खास आवाहन

राज्यात आज ताही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचे चटके बसणार आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तर कोकणात दमट हवामानाचा अंदाज असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात 48 तासांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. 

कोकणात आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत दमट हवामानाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत आज कमाल तापमान 34-38 अंशांपर्यंत राहील. त्यामुळे अवकाळी पावसाचा धोका वाढल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमधील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच काही भागात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर पुण्यात कमाल तापमान 36 अंशांपर्यंत जाईल. दरम्यान पुढील काही दिवस पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा- Mumbai Aiport Fire Incident: मुंबई विमानतळावर लागली आग; धुराचे लोट आणि प्रवाशांची पळापळ, शॉर्ट सर्किट की घातपात?

दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव येथे हवामानात मोठे बदल जाणवत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह लातूर आणि धाराशिवमध्ये कमाल तापमान 36-40 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात आज कमाल तापमान 39-43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात अवकाळी पावसाचा अलर्ट नसून हवामान कोरडे आणि उष्ण राहील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number