Weather Update : राज्यातील 15 जिल्ह्यांना अलर्ट जारी! 20 एप्रिलनंतर हवामानात होणार मोठे बदल; IMD चा इशारा काय?

एप्रिलच्या सुरुवातीलाच पडलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवनासह शेती क्षेत्रावरही परिणाम जाणवू लागला आहे. पुढील काही दिवसात तापमानाचा पारा अजून वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Weather Update : राज्यातील 15 जिल्ह्यांना अलर्ट जारी! 20 एप्रिलनंतर हवामानात होणार मोठे बदल; IMD चा इशारा काय?

एप्रिलच्या सुरुवातीलाच पडलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवनासह शेती क्षेत्रावरही परिणाम जाणवू लागला आहे. याचपार्श्वभूमिवर पुढील काही दिवसात तापमानाचा पारा अजून वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे तसेच घराबाहेर पडताना टोपी रुमाल गॉगल यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणासह मुंबईत आज कमाल तापमान 34-37 अंशांपर्यंत असून पुण्यात सध्या उन्हाचा पारा 41 अंशांच्या पार गेला असून, केवळ माणसेच नाही तर पक्षीही या उष्णतेने होरपळून निघत आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यासह शहरात उष्णतेची तीव्र लाट पसरली असून तापमान 40 सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. 

बीड जिल्ह्यातील तापमानात कालपासून वाढ होऊ लागली आहे. आज दुपारी तापमान तब्बल 41 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून या वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये तापमानाच्या पारा 42 अंश डिग्री पार झालेला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत असून आता रस्त्यांवरही शुकशुकाट बघायला मिळत आहे. तर हवामान विभागाने नागरिकाना 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नये अशा सूचना दिले आहेत. 

हेही वाचा- Mango Farmers : आधी पाऊस अन् आता उन्हाने आंबा खाल्ला! कोकणचा राजा हापूस यंदा निसर्गाच्या दुहेरी संकटात

वर्धा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने तब्बल 44℃ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला. उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 42 अंशावर जाऊन पोहोचल्याने कमालीची उष्णता वाढली असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

विदर्भात देखील उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अकोला येथे तब्बल 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत ते देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. नागपूरमध्येही पारा 42 अंशांच्या पुढे गेल्याने सकाळी 11 नंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दरम्यान, काही भागांत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, 20 एप्रिलनंतर तापमानात काहीशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number