मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईसह कोकण पट्ट्यात होत आहे. दरम्यान, कोकण पट्ट्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे मुंबईसह कोकणात वाढत्या उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या सांताक्रूझ येथील हवामान केंद्रात 19 अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे 21.7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
हेही वाचा- T20 World Cup 2026 IND vs PAK: पाकिस्तानने शरणागती पत्करली! पीसीबीची अट फेटाळत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीने घेतला मोठा निर्णय
10 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रात हवामान मुख्यत्वे स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहील. आज राज्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात निरभ्र आणि कोरडे वातावरण राहील. यावेळी कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 17 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक विभागात आज हवामान प्रामुख्याने कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस ते 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस ते 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. दिवसा उष्णता जाणवेल, तर रात्री हलकी थंडी कायम राहील.
पुण्यात आज 10 फेब्रुवारी रोजी प्रामुख्याने वातावरण उबदार राहील, तर कमाल तापमान अंदाजे 31 अंश सेल्सिअस आणि किमान 17अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच नागपूरमध्ये धुक्याचे वातावरण राहण्याची शक्यता आहे, यावेळी कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअस राहील. विदर्भात आज हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे असून आकाश निरभ्र असेल. दिवसा कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पावसाची कोणतीही शक्यता नसली तरी हलक्या वेगाने वारे वाहतील. नागपूरसह अमरावती, अकोला, वर्धा येथे उष्ण हवामान राहील.