‘आम्ही घरात बसून चर्चा करणारे नाही’

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी दोघांनीही कोनाशिलेचे अनावरण केले. त्यानंतर येथे उभारलेल्या व्यासपीठावर दीपप्रज्वलन केले. यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर आम्ही […]

‘आम्ही घरात बसून चर्चा करणारे नाही’

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी दोघांनीही कोनाशिलेचे अनावरण केले. त्यानंतर येथे उभारलेल्या व्यासपीठावर दीपप्रज्वलन केले. यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर आम्ही घरात बसून काम करणारे नाही तर फिल्डवर उतरून काम करणारे लोकं आहोत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गत डिसेंबरमध्ये नागपूर ते शिर्डी या मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर आज आपण दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. सुप्रीम कोर्टाने आपला मार्ग मोकळा केला तसा आम्ही समृद्धी मार्गाचा दुसरा टप्पा मोकळा केला. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो. आम्ही शब्दाला जागतो ते आमचे कर्तव्य आहे. आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो. जाहीरपणे शब्द देतो. काही लोकांप्रमाणे घरात बसून आम्ही चर्चा करीत नाही.

तर, दिलेला शब्द आम्ही पाळतो. दिलेला शब्द पाळायची आम्हाला सवय आहे. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली. मग त्या शब्दाला जागणं हे आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आम्ही पार पाडत असतो. आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो. जाहीरपणे शब्द देतो. काही लोकांप्रमाणे आम्ही घरात बसून चर्चा करत नाही. तर बंद खोलीत बसल्याने काहीही बोलायला मोकळे असतात. त्यामुळे आपण खुले किताब आहोत आणि त्याचमुळे असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतात, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी माझ्याकडे काही कामच नव्हतं. तेव्हा फडणवीसांनी सांगितलं, असं काम देतो दुसरं काम करण्याची गरजच पडणार नाही. तेव्हा त्यांनी माझ्याकडे समृद्धी महामार्गाचं काम दिलं अन् मीही रस्त्यावर उतरुन काम केलं. अनेक अडथळे आले, विरोध केला गेला परंतु आम्ही अडचणीतून मार्ग काढून पुढे जात राहिलो. शेतकऱ्यांना तीन तासांमध्ये आम्ही पैसे देण्याचं काम केलं, त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढत गेला, अशी माहिती शिंदेंनी यावेळी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number