माफ करा, आम्ही ईडी कार्यालयावर येणार – जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शरद पवार स्वत: मुंबईतील ईडीच्या कार्यलयात उपस्थित राहणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी ईडी कार्यलयाबाहेर उपस्थित राहू नये तसेच गर्दीही करू नये असे म्हणाले आहे. मात्र तरीही ईडी कार्यालय […]

माफ करा, आम्ही ईडी कार्यालयावर येणार – जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शरद पवार स्वत: मुंबईतील ईडीच्या कार्यलयात उपस्थित राहणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी ईडी कार्यलयाबाहेर उपस्थित राहू नये तसेच गर्दीही करू नये असे म्हणाले आहे. मात्र तरीही ईडी कार्यालय येथे येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या मुंबईतील सिलव्हर ऑक बंगल्यावर पवारांना भेटण्यासाठी दाखल झाले. यावेळी पवारांना प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप लावला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

माफ करा, पहिल्यांदा आम्ही तुमचं ऐकणार नाही. महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत.

कर्क रोग, मांडीच्या हाडाचं ऑपरेशन, पायाला झालेल्या इजा, तरी तुम्ही लढताय.

वय वर्ष 79 असूनही तुम्ही आमच्यासाठी सोसत आहात, उद्यासाठी माफ करा.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली भावना.

पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन –

कायर्त्यांनी आणि समर्थकांनी ईडी कार्यलयाबाहेर उपस्थित राहून गर्दी करू नये.

राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे असे ट्विट करत पवारांनी सांगितले

पवार आज ‘ईडी’ कार्यालयात –

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतील ईडीच्या कार्यलयात उपस्थित राहणार आहे.

दुपारी 2 वाजताच्या सुमारास ईडीच्या कार्यलयात हजर राहणार आहेत.

मात्र ईडीने चौकशीसाठी पवारांना समन्स बजावलेले नसल्याने प्रवेश नाकारण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number