Watermelon Seeds Benefits: कलिंगड खाताना बिया काढून टाकता? थांबा! पुरुषांच्या आरोग्यासाठी आहेत जबरदस्त फायदे

कलिंगड खाताना अनेकजण त्याच्या बिया फेकून देतात, पण या बियांमध्ये प्रथिने, झिंक आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात

Watermelon Seeds Benefits: कलिंगड खाताना बिया काढून टाकता? थांबा! पुरुषांच्या आरोग्यासाठी आहेत जबरदस्त फायदे

Watermelon Seeds Benefits: उन्हाळा सुरू होताच बाजारात रसाळ आणि थंडावा देणाऱ्या कलिंगडांची रेलचेल दिसू लागते. शरीराला पाणी पुरवणे आणि उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी अनेकजण आवडीने कलिंगड खातात. मात्र हे फळ खाताना त्यातील काळ्या बियांकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. अनेकजण या बिया काढून टाकतात किंवा कचऱ्यात फेकून देतात. परंतु पोषणतज्ज्ञांच्या मते, कलिंगडाच्या बिया प्रत्यक्षात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.

तज्ज्ञ सांगतात की या बियांमध्ये प्रथिने, ओमेगा फॅटी अ‍ॅसिड, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम आणि तांबे यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे घटक शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक असतात. विशेषतः पुरुषांच्या आरोग्याच्या दृष्टीने या बिया उपयुक्त मानल्या जातात.

पुरुषांमध्ये प्रजननक्षमतेसाठी झिंक हा घटक महत्त्वाचा मानला जातो. कलिंगडाच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण चांगले असल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास आणि शरीरातील महत्त्वाच्या संप्रेरकांचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. काही अभ्यासांमध्ये झिंकची कमतरता असल्यास पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा:Ginger Garlic Paste : तुमच्या स्वयंपाकघरात भेसळयुक्त आलं-लसूण पेस्ट तर नाही ना? घरच्या घरी करा 5 सोप्या टेस्ट

याशिवाय वय वाढल्यानंतर पुरुषांना प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले काही पोषक घटक प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. त्यामुळे नियमित आणि मर्यादित प्रमाणात या बियांचे सेवन केल्यास शरीराला फायदा होऊ शकतो.

हृदयाच्या आरोग्यासाठीही या बिया उपयुक्त असल्याचे मानले जाते. त्यामध्ये असलेले काही अमिनो अ‍ॅसिड्स आणि खनिजे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य होऊ शकते. तसेच या बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना होणाऱ्या हानीपासून संरक्षण देण्यास मदत करतात.

कलिंगडाच्या बियांचे इतरही काही फायदे सांगितले जातात. काही तज्ज्ञांच्या मते, या बिया इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकतात, त्यामुळे मधुमेह नियंत्रणासाठीही त्यांचा उपयोग होऊ शकतो. तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील या बियांमधील पोषक घटक उपयुक्त ठरतात.

हेही वाचा: Natural Home Remedies to Get Pink Lips | गुलाबी – मुलायम ओठांसाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील वरदान; झटक्यात घालवा काळपटपणा

मात्र या बिया खाण्याची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे आहे. अनेकजण कलिंगड खाताना थेट कच्च्या बिया चावून खातात, पण असे केल्यास त्यातील पोषक घटक पूर्णपणे मिळत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, या बिया स्वच्छ धुवून वाळवून त्यांना हलक्या आचेवर भाजून खाणे अधिक फायदेशीर ठरते. भाजलेल्या बिया स्नॅक्सप्रमाणे खाल्ल्या जाऊ शकतात.

तसेच या बियांची पावडर करून ती सॅलड, स्मूदी किंवा दह्यात मिसळून खाण्याचाही पर्याय आहे. काहीजण या बिया भिजवून अंकुरित करूनही खातात. या पद्धतीने खाल्ल्यास शरीराला त्यातील पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.

तथापि, कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणातच खाणे आवश्यक असते. कलिंगडाच्या बियांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवसाला एक ते दोन चमचे एवढे प्रमाण पुरेसे मानले जाते. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास कलिंगडाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number