पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र येथे महापालिकेच्या वतीने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (१९ जानेवारी) करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे २० जानेवारी ला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, लष्कर जल केंद्र, नवीन व जुने होळकर जल केंद्र, भामा आसखेड जल केंद्र परिसर, वारजे जल केंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, एसएनडीटी (एमएलआर) परिसर, एसएनडीटी (एचएलआर) परिसर व चतुःशृंगी टाकी परिसर, वडगाव जल केंद्र परिसर तसेच कोंढवे धावडे जल केंद्र येथील विद्युत / पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याने या परिसरातील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले.