हैदराबाद येथून अपहरण झालेला 3 वर्षीय मुलगा सापडला वाशिममध्ये

हैदराबाद येथील रुद्रमनी शिवकुमार हा तीन वर्षीय मुलगा एका हॉटेल समोर खेळत असताना त्याचे अपहरण झाले होते. ही घटना 8 फेब्रुवारीला घडली असून मुलाला अनेक ठिकाणी शोधण्यात आले मात्र त्याचा पत्ता लागला नाही शेवटी मालेगाव पोलिसांनी या मुलाला शोधून काढलं असून याप्रकरणी अपहरणकर्ता शाम सोळंकी यास अटक करण्यात आली आहे. मुलाच्या अपहरणाची तक्रार अबीट पोलीस […]

हैदराबाद येथून अपहरण झालेला 3 वर्षीय मुलगा सापडला वाशिममध्ये

हैदराबाद येथील रुद्रमनी शिवकुमार हा तीन वर्षीय मुलगा एका हॉटेल समोर खेळत असताना त्याचे अपहरण झाले होते. ही घटना 8 फेब्रुवारीला घडली असून मुलाला अनेक ठिकाणी शोधण्यात आले मात्र त्याचा पत्ता लागला नाही शेवटी मालेगाव पोलिसांनी या मुलाला शोधून काढलं असून याप्रकरणी अपहरणकर्ता शाम सोळंकी यास अटक करण्यात आली आहे.

मुलाच्या अपहरणाची तक्रार अबीट पोलीस स्टेशन, हैदराबाद येथे दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पळवून नेलेल्या रुद्रमणी शिवकुमारचा शोध घेत हैद्राबादचे पोलीस पथक काल मालेगावात दाखल झाले होते. पोलिसांनी मालेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेवून अमनवाडी रेल्वे स्टेशन व आजूबाजूच्या परिसरात मुलाचा शोध घेतला, मात्र त्याचा काही पत्ता लागला नाही शेवटी दोन्ही पथके परत मालेगाव येथे आले. मालेगावमधील पोलिसांनी मुलाचा शोध घेतला. मालेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अमनवाडी येथील शाम सोळंकी याच्याकडे मुलगा मिळून आला. अपहरण करणाऱ्या शाम सोळंकीला पोलिसांनी अटक केली असून, अपहरण झालेल्या रुद्रमनीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number