भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा इशारा

मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी :  युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थात जागतिक कुस्ती संघटनेनं भारतीय महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतलीय. एक निवेदन जारी करत जागतिक कुस्ती संघटनेनं दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना केलेल्या अटकेच्या कारवाईचा निषेध केलाय. २८ मे २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर कुस्तीपटू आंदोलन करत असताना, त्यांना तिथून ताब्यात घेतलं. यावेळी काही कुस्तीपटूंना फरफटत नेलं. त्याच […]

भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा इशारा

मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी :  युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थात जागतिक कुस्ती संघटनेनं भारतीय महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतलीय. एक निवेदन जारी करत जागतिक कुस्ती संघटनेनं दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना केलेल्या अटकेच्या कारवाईचा निषेध केलाय. २८ मे २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर कुस्तीपटू आंदोलन करत असताना, त्यांना तिथून ताब्यात घेतलं. यावेळी काही कुस्तीपटूंना फरफटत नेलं. त्याच दिवशी संध्याकाळी ताब्यात घेतलेल्या कुस्तीपटूंना सोडण्यात आलं. मात्र, या कारवाईवर भारतासह जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला आणि निषेध नोंदवण्यात आला.

जागतिक कुस्ती संघटनेनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, “नुकतीच घडलेली घटना चिंताजनक आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले ही बाब अधिक चिंताजनक आहे. ज्या ठिकाणी ते महिनाभर आंदोलन करत होते, तिथे देखील प्रशासनाने कारवाई केली. कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा आणि अटकेचा जागतिक कुस्ती संघटना तीव्र निषेध करत आहे. महिला कुस्तीपटू ज्यांच्यावर कारवाईसाठी गेले काही महिने आंदोलन करत आहेत, त्या भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्याबाबत आतापर्यंत झालेल्या तपासावर देखील जागतिक कुस्ती संघटनेनं निराशा व्यक्त केलीय.

जागतिक कुस्ती संघटनेनं संबंधित अधिकाऱ्यांना या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका ४५ दिवसांच्या आत न घेतल्यास बरखास्त करण्याचा इशारा देखील जागतिक कुस्ती संघटनेनं दिलाय. ब्रिजभूषण शरण सिंग हे भारतीय कुस्ती महासंघापासून वेगळे झाले आहेत आणि ते आता प्रभारी नाहीत हे देखील UWW च्या नोटीसमध्ये आहे. UWW भारतीय कुस्तीपटूंसोबत बुधवारी किंवा गुरुवारी चर्चा करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यूडब्ल्यूडब्ल्यूने म्हटले की, कुस्तीपटूंना अटक करणे आणि त्यांना आंदोलन स्थळावरून हाकलून लावणे अधिक चिंताजनक आहे. या आरोपांच्या चौकशीचा आतापर्यंत कोणताही अहवाल आलेला नाही, हीदेखील चिंताजनक बाब आहे. UWW आरोपांच्या निष्पक्ष आणि पारदर्शक तपासासाठी उत्सुक आहे. कुस्तीपटूंशी बोलेपर्यंत त्यांच्या अटी आणि सुरक्षेची माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. बृजभूषण यांनी अनेक कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचं खेळाडूंचं म्हणणं आहे. बृजभूषण यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. ही कारवाई व्हावी अशी कुस्तीपटूंची मागणी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number