इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अ.भा. वारकरी मंडळाचं निवेदन

समाजसेविका तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याविरोधात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अंबेजोगाई विभागप्रमुख बाळासाहेब महाराज फपाळ यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. ‘वारकरी संप्रदायाच्या झालेल्या अपमानाच्या संबंधित विनाकारण आरोप करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी’ अशी मागणी बाळासाहेब महाराज फपाळ यांनी केली आहे. उपजिल्हाधिकारी […]

इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अ.भा. वारकरी मंडळाचं निवेदन

समाजसेविका तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याविरोधात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अंबेजोगाई विभागप्रमुख बाळासाहेब महाराज फपाळ यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

‘वारकरी संप्रदायाच्या झालेल्या अपमानाच्या संबंधित विनाकारण आरोप करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी’ अशी मागणी बाळासाहेब महाराज फपाळ यांनी केली आहे.

उपजिल्हाधिकारी माजलगाव यांच्याकडे सर्व वारकरी किर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य भजनी मंडळ सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आलं. ‘इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य गुरुचरित्र ग्रंथाच्या 37 व्या अध्यायातील ओवी आहे. त्यामुळे महाराजांचे वक्तव्य ग्रंथ व संत यांच्या विचारास धरुन आहे.’ असं त्यांचं म्हणणं आहे.

‘आम्ही सर्व वारकरी मंडळी इंदुरीकर महाराजांचे समर्थन करत आहोत. या प्रकरणात महाराजांवर विनाकारण गुन्हा दाखल झाल्यास आम्ही सर्व वारकरी मंडळी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू.’ असं निवेदन बाळासाहेब महाराज फपाळ यांनी दिलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number