BMC Election 2026: ‘स्वतःच्या भावासाठी लोकशाहीची थट्टा नको’; हरिभाऊ राठोड यांचा राहुल नार्वेकरांना टोला

या सगळ्या घडामोडींनंतर आता प्रभाग क्रमांक 226 मध्ये सर्वपक्षीय एकजूट राहुल नार्वेकर यांच्या भावाविरोधात होताना दिसत आहे.

BMC Election 2026: ‘स्वतःच्या भावासाठी लोकशाहीची थट्टा नको’; हरिभाऊ राठोड यांचा राहुल नार्वेकरांना टोला

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कुलाबा परिसरातील प्रभाग क्रमांक 226 सध्या राजकीय रणांगणात केंद्रस्थानी आला आहे. विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांच्याविरोधात गंभीर आरोप होत असून, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते हरिभाऊ राठोड यांनी “राहुल नार्वेकर उलट्या बोंबा मारत आहेत,” अशी थेट टीका करत या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे.

हरिभाऊ राठोड यांनी सांगितले की, तेजल पवार या प्रभाग क्रमांक 226 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून, 3 तारखेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपक पवार यांनी दबाव तंत्राबाबत गंभीर आरोप केले होते. अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप सातत्याने समोर येत आहेत. हे सर्व प्रयत्न राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे बिनविरोध निवडून यावेत, यासाठीच सुरू असल्याचा आरोप राठोड यांनी केला.

राठोड यांनी पुढे म्हटले की, पाच दिवस शांत राहिल्यानंतर अचानक राहुल नार्वेकर यांनी वेगळा दावा मांडण्यास सुरुवात केली आहे. जर हे मुद्दे खरे असते, तर ते आधीच का मांडले गेले नाहीत? हा संपूर्ण प्रकार म्हणजे “फेक नॅरेटिव्ह” तयार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घडामोडींमुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीही बदनामी होत असून, संबंधित प्रकरणात पक्षाने आणि प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यमान आयुक्त गगराणी आणि वाघमारे यांची या प्रकरणात विशेष जबाबदारी असल्याचेही राठोड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Abhimanyu Singh : अभिमन्यू सिंह यांच्या घरावर दरोडा; तब्बल एक कोटी 37 लाख रुपये लंपास, पोलिसांनी आरोपीला केली अटक

दरम्यान, या वादाला सुरुवात झाली ती तेजल पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे. तेजल पवार यांनी आरोप केला होता की, राहुल नार्वेकर यांनी आपल्याला उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावले. मात्र, राहुल नार्वेकर यांनी हे आरोप फेटाळून लावत उलट तेजल पवार यांनीच उमेदवारी मागे घेण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला होता. या परस्परविरोधी आरोपांमुळे प्रभाग क्रमांक 226 मधील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

या सगळ्या घडामोडींनंतर आता प्रभाग क्रमांक 226 मध्ये सर्वपक्षीय एकजूट राहुल नार्वेकर यांच्या भावाविरोधात होताना दिसत आहे. भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांना रोखण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी मतभेद विसरून तेजल पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कालच तेजल पवार यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले.

यानंतर मनसे, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षांनी एकत्र येत तेजल पवार यांना पाठिंबा दिला आहे. मनसेने तेजल पवार यांना अधिकृत पुरस्कृत केले असून, ठाकरे गटाने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या तेजल पवार या प्रभागात जोमाने प्रचार करत आहेत.

एकूणच, प्रभाग क्रमांक 226 मध्ये बदललेल्या समीकरणांमुळे आता भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांच्यासाठी ही निवडणूक चुरशीची आणि आव्हानात्मक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. निवडणूक पारदर्शक आणि निर्विवाद व्हावी, अशी मागणी होत असताना, पुढील काही दिवसांत या प्रकरणावर प्रशासन आणि राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Madhav Gadgil Passes Away: निसर्ग जोपासण्याचा ‘मंत्र’ देणारा ऋषी हरपला! डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number