पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या अविश्वास प्रस्तावावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे इमरान खान यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
इमरान खान यांच्या विरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावावर शनिवारी मतदान होणार आहे. पाकिस्तानच्या संसदेत खासदारांची एकूण संख्या ३४२ आहे. त्यामुळे इमरान खान यांना बहुमतासाठी १७२ खासदारांची गरज आहे. इमरान खान यांच्यासोबत १४२ खासदारांचं पाठबळ आहे तर त्यांच्याविरोधात वेगेवेगळ्या पक्षांचे १९९ खासदार असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानातील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ, पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी, पीएमएल-एन उपाध्यक्ष मरियम नवाज यांसह अनेक नेते पाकिस्तानी संसदेत दाखल झाले आहेत.