Virat Kohli RCB Playing XI : कोहलीची धडकी भरवणारी RCB XI; अनेक वर्षे RCB साठी खेळलेल्या खेळाडूलाच डावललं

आरसीबीच्या अधिकृत X ट्विटर अकाउंटवर विराट कोहलीची एक मुलाखत समोर आली आहे. यावेळी त्याने आरसीबीची ऑल-टाइम प्लेइंग 11 जाहीर केली.

Virat Kohli RCB Playing XI : कोहलीची धडकी भरवणारी RCB XI; अनेक वर्षे RCB साठी खेळलेल्या खेळाडूलाच डावललं

आयपीएल (IPL) च्या 19 व्या हंगामाचा बिगुल वाजला असून ही स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. त्यापूर्वी आरसीबीच्या अधिकृत X ट्विटर अकाउंटवर विराट कोहलीची एक मुलाखत समोर आली आहे. यावेळी त्याने आरसीबीची ऑल-टाइम प्लेइंग 11 जाहीर केली. त्याने आरसीबीसाठी बराच काळ आपला प्राण पणाला लावून खेळणाऱ्या वेगवान गोलंदाजाला त्याच्या ऑल-टाइम प्लेइंग 11 मधून डावललं आहे.

कोहलीने त्याच्या ऑल-टाइम प्लेइंग 11 मधून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांना बाहेर ठेवले. गेल्या हंगामात आरसीबीने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे यंदाच्या  हंगामाची सुरुवातही ते विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. मात्र, कोहलीने निवडलेल्या खेळाडूंनंतर चाहत्यांना वेगळाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिराजने 2018 ते 2024 या काळात RCB साठी 87 सामन्यांत 83 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो फ्रँचायझीसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मोहम्मद सिराज आयपीएल 2026 साठी गुजरात टायटन्स कॅम्पमध्ये सामील झाला आहे. 

हेही वाचा- IPL 2026: आयपीएल 2026 ठरणार 'फेअरवेल' सीझन? धोनीसह 'हे' 6 दिग्गज खेळाडू घेणार निवृत्ती
विराट कोहलीची ऑलटाइम RCB प्लेइंग 11
ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, केएल राहुल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, अनिल कुंबळे, मिचेल स्टार्क, डेल स्टेन, युझवेंद्र चहल.

RCB प्लेइंग 11
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number