मुंबई : ‘एक ऐसा व्होट जिहाद करो… जिसके सिपेसालार है : शरद पवार.. अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली है…’ हे वक्तव्य आहे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांचे… अशी माहिती देत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आलेल्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा व्होट जिहाद, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सैफ है… याची चर्चा सुरू झाली आहे. शेलारांनी व्हिडीओ ट्वीट करुन लक्ष द्या, असे आवाहन केले आहे.
एक ऐसा व्होट जिहाद करो…
जिसके सिपेसालार है : शरद पवार
अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटौले
और हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली…
ही मुक्ताफळे आहेत, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांची…
2 तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत युट्युब हँडलवर हा… pic.twitter.com/thp2d2ZSVZ — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 15, 2024
‘सज्जाद नोमानींविरोधात कारवाई करा’
व्होट जिहादचे आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानींविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या किरीट सोमैयांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
Election Commission has forwarded My Complaint against MAULANA KHALILUR RAHMAN SAJJAD NOMANI asking Muslims to Social Boycott of Muslims supporting BJP to Maharashtra CEO Chief Election Officer. CEO Maharashtra has asked concern officer to inquire & take appropriate action pic.twitter.com/6wvGhzmjWk — Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 16, 2024