आर माधवनने शाहरुख आणि सैफचा जुना व्हिडिओ केला व्हायरल…

बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आर माधवन याने अनेक चित्रपटत काम केलं आहे. आर माधवन सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. आर माधवन याने सोशल मीडिया नुकताच जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शाहरुख खान आणि सैफ अली खानची खिल्ली उडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताचं […]

आर माधवनने शाहरुख आणि सैफचा जुना व्हिडिओ केला व्हायरल…

बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आर माधवन याने अनेक चित्रपटत काम केलं आहे. आर माधवन सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. आर माधवन याने सोशल मीडिया नुकताच जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शाहरुख खान आणि सैफ अली खानची खिल्ली उडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताचं या व्हिडिओवर चाहत्यांना दिलेल्या भन्नाट उत्तरे दिल्यानं हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा ‘अवॉर्ड्स शो’मधील आहे. या अवॉर्ड शोला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्याचे दिसत आहे. तसेच या शोचे सूत्रसंचालन अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सैफ अली खान करताना दिसत आहेत. दरम्यान सैफ आणि शाहरुख प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आर माधवनला काही प्रश्न विचारताना दिसतात. आर माधवनमध्ये ‘आर’चा अर्थ काय? त्यावर शाहरुख मजेशीर अंदाजात ‘आर म्हणजे रेटेड? रियल? की Really Talented असा तर होत नाही ना?’ असे बोलताना दिसतो. आर माधवन हा शाहरुख आणि सैफला शांतपणे उत्तर देत ‘आरचा अर्थ रंगानाथन माधवन आहे’ असे सांगतो. त्यानंतर सैफ माधवनला त्याच्या चित्रपटातील काही डायलॉग तमिळ भाषेत बोलण्यास सांगतो. आर माधवन तेही त्यांना करून दाखवितो. नंतर शाहरुख ‘आज आमची खिल्ली कोणीही उडवू शकतो. तू तमिळमध्ये करु शकतोस का?’ असे माधवनला बोलताना दिसतो. त्यावर माधवन तमिळ भाषेत ‘मूर्ख लोकांनो, इथून पळा’ असे बोलताना दिसतो. ते ऐकून प्रेक्षकांना हसू अनावर होते. सध्या हा आर माधवनचा हा जूना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number