नाशिक, १२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : श्रावण महिन्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे याकाळात लोक धार्मिक स्थळांना आणि मंदिरांना भेट देत असतात. यातीलच एक म्हणजे नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर. लागोपाठ आलेल्या शासकीय सुट्या आणि त्यानंतर श्रावण पर्वकाळासाठी होणारी गर्दी पाहता १२ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या काही व्हीआयपींना दर्शन दिले जाणार आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेत त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्षांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबतचे पत्र दिले. यात मंदिर ट्रस्ट विश्वस्तांनी भाविकांसाठी दर्शनानंतर राजगिरा लाडू देण्यात येणार आहेत. तसेच रांगेत बिस्कीट पुडे, पाण्याची बाटली मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबी नमूद केल्या आहेत.