विनायक राऊतांची अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशातच, आता महाविकास आघाडी यांच्याकडून अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली आहे.

विनायक राऊतांची अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, अजित पवारांनी अलीकडेच असं विधान केले होते की, 'मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य जुळून यावे लागतो. कारण मलाही अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण संधी कुठे आहे?' यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच, आता महाविकास आघाडी यांच्याकडून अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली आहे.

काय म्हणाले विनायक राऊत?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी थेट अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत म्हणाले की, 'अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावे, त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.' त्यासोबतच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावत विनायक राऊत म्हणाले की, 'एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये दुरावा वाढत असून शिंदेंना नैराश्य आले आहे'. 

हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर

ठाकरे बंधू एकत्र येणार का?

'सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहेत. त्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेची हीच इच्छा आहे की ठाकरे बंधू एकत्र यावे,' असे देखील विनायक राऊत म्हणाले. 'महाराष्ट्रासमोर आमचे वाद, भांडण शुल्लक गोष्टी आहेत,' असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

विनायक राऊतांचा मोदींवर टीका:

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर विनायक राऊत यांनी मोदी सरकारवर टीका करत म्हणाले की, 'पहलगाममध्ये दहशतवादी अचानक आले नाहीत. तर पहलगाम हल्ला हा मोदी सरकारचं अपयश आहे. सध्या युद्धाचं वातावरण तयार केले जात असून, पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे. अनेक लोकोपयोगी योजना बंद पडल्या आहेत,' असा हल्लाबोल यावेळी राऊत यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number