मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि सर्व मराठा संघटनांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत आरक्षण लढ्याची पुढची दिशा आणि रणनीती ठरवण्यात आली.
पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक आंदोलन करणार असून पहिला मोर्चा बीडमध्ये होणार आहे. हा मोर्चा मूक नसेल अशी माहिती मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाचा मुद्दा न्ययालयात टिकला नाही. आता या आरक्षणाच्या लढ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.