राष्ट्रवादी शदर पवार यांच्या पक्षातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. विकास लवांडे हे नुकतेच वारकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे चर्चेत आले होते. त्यांनी वारकरी संप्रदायात घुसखोर आले असून त्यांनी वारकरी संप्रदायात द्वेष पसरवला असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले होते. भाजपसाठी काम करणाऱ्या 20 कीर्तनकारांची नावे त्यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या विधानामुळे संग्राम बापू भंडारे यांनी त्यांच्यावर शाई फेक केली होती.
त्यांच्यावर शाईफेक केल्याच्या काही काळानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला होता. या शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर विकास लवांडे यांच्याविरोधात वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचे वक्तव्य केल्या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता विकास लवांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विकास लवांडे यांनी आपल्याला कोणत्या गुन्ह्यात अटक झाली याची माहिती पोलिसांनी दिली नसून लवांडे यांना खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून केला जात आहे. दरम्यान लवांडे यांच्या अटकेमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा- Raj Thackeray: 2008 मधील ‘त्या’ प्रकरणातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता,कोर्टाचा निकाल
दरम्यान याप्रकरणी विकास लवांडे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी.. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.”
पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या… pic.twitter.com/mfODGUBIlb — Vikas Lawande (@VikasLawande1) May 21, 2026