Vikas Gogawale: ‘आम्हाला रुद्र आवतारात यायला लावू नका, तुम्हाला….’; विकास गोगावलेंचा शिवसैनिकांना थेट इशारा

बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य आणि भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.

Vikas Gogawale: ‘आम्हाला रुद्र आवतारात यायला लावू नका, तुम्हाला….’; विकास गोगावलेंचा शिवसैनिकांना थेट इशारा

बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य आणि भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. संघटनेशी गद्दारी करणाऱ्या शिवसैनिकांना आम्हाला आमच्या रुद्रावतारात यायला लावू नका असं म्हणत शिवसैनिकांचे कान टोचले आहेत.

मला सगळ्या बातम्या असतात, आम्हाला काही समजत नाही अस समजू नका अस सांगताना उगीच आम्हाला आमच्या रुद्र आवतारात यायला लावू नका असा इशारा विकास गोगावले यांनी गद्दारी करणाऱ्यांना दिला आहे. गद्दारीच काम कोणी करू नका, तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे असा बाहेरचा रस्ता दाखवणारा टोका सल्ला देखील विकास गोगावले यांनी संघटनेशी गद्दारी करणाऱ्यांना दिला आहे.  संघटनेवर कोण रोष काढत असेलतर खपवून घेणार नाही असा आक्रमक इशारा देखील गोगावले यांनी दिला आहे.

हेही वाचा- Dhule NCP Crisis : धुळ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! माजी आमदारासह 8 नगरसेवकांचा राजीनामा?
तर दुसरीकडे महाड तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेल्या खरवली काळीज ग्राम पंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर यांचा असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगार येथे एकामागोमाग एक मोठे धक्के शिवसेनेने राष्ट्रवादीला दिले आहेत, काळजी खरवली ग्राम पंचायत राष्ट्रवादीच्या हातुन जाण हा असाच मोठा धक्का मानला जात आहे. खरवली काळीज ग्राम पंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर यांनी आपल्या असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी म्हामुणकर यांच्या हातात भगवा झेंडा देत त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांच शिवसेनेत स्वागत केल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number