विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा

विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याआधी विजया रहाटकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या.

विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा

नवी दिल्ली : विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याआधी विजया रहाटकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी आहेत. त्यांच्या समाजकार्याचीही नियुक्ती करताना दखल घेण्यात आली. विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवव्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

अर्चना मजुमदार राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झाल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, महिलांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी तसेच महिलांना प्रगतीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी काम करतो. 

विजया रहाटकर यांचे कार्य

भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच विजया रहाटकर यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. त्या २०१६ ते २०२१ या काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजया रहाटकर यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबविले. "सक्षमा" उपक्रमामधून अॅसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे. विजयाताईंनी डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी, महिला आयोगाचे "साद" नियतकालिक यासारखे उपक्रम देखील घेतले. एका अर्थाने त्यांनी आयोगालाच पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले होते. 

छत्रपती संभाजी नगरच्या महापौर त्याआधी २००७ ते २०१० या कालावधीत तत्कालीन औरंगाबाद आणि विद्यमान छत्रपती संभाजीनगरच्या महापौर असताना विजया रहाटकर यांनी शहरकेंद्रीत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. यात आरोग्य सेवेपासून ते पायाभूत सुविधा निर्मितीपर्यंत अनेक घटकांचा समावेश होता. त्याचबरोबर शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक सांस्कृतिक केंद्र म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून दिली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाद्वारे शहराच्या महसुलात मोलाची भर घातली. महापौर पदाच्या काळात विजयाताई महाराष्ट्र मेयर कौन्सिलच्या अध्यक्षा आणि ऑल इंडिया मेयर कौन्सिलच्या उपाध्यक्षदेखील होत्या. त्या सध्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेच्या सल्लागार संचालिकादेखील आहेत. 

भौतिकशास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विजयाताईंनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये 'विधिलिखित' या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचे संपादन , 'अग्निशिखा धडाडू द्या', 'औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स', 'मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम' यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number