Vidyanand Bapat: ध्वनीप्रदूषणाविरुद्धच्या लढ्यावर बापट ठाम; मीम्स आणि राजकीय टीकेला दिलं रोखठोक उत्तर, मुख्यमंत्र्यांकडून भाषा कौशल्य आणि भूमिकेचे कौतुक

सर्व घडामोडींवर बापट यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया देत, मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.

Vidyanand Bapat: ध्वनीप्रदूषणाविरुद्धच्या लढ्यावर बापट ठाम; मीम्स आणि राजकीय टीकेला दिलं रोखठोक उत्तर, मुख्यमंत्र्यांकडून भाषा कौशल्य आणि भूमिकेचे कौतुक

Vidyanand Bapat firm stand against DJ Noise Pollution: पुण्यातील उत्सवांमध्ये होणाऱ्या डीजे आणि आवाजाच्या प्रदूषणाविरोधात ठाम भूमिका घेणारे विद्यानंद बापट सध्या देशभरात चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात आणि समर्थनार्थ मीम्सचा महापूर आला असून, एआय तंत्रज्ञानाद्वारे त्यांना डीजेवर नाचताना दाखवणारे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषिक कौशल्याचे आणि भूमिकेचे कौतुक केले. या सर्व घडामोडींवर बापट यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया देत, मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुकासह 'हा' सल्ला; त्यावर काय म्हणाले बापट?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांच्या भाषाशैलीचे कौतुक करतानाच 'इतरांच्या भावना न दुखावता मुद्दा मांडावा' असा सल्ला दिला होता. यावर भाष्य करताना बापट म्हणाले की, भाषा हे केवळ संवादाचे एक माध्यम आहे. भाषेवर प्रभुत्व असणे आणि तिचा योग्य कारणासाठी वापर करणे महत्त्वाचे असते. 'भावना दुखणे' या मुद्द्यावर टोला लगावताना त्यांनी विचारले की, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे लोकांचे डोके दुखते आणि हृदयाला त्रास होतो, मग राजकीय नेत्यांच्या भावना दुखतात म्हणजे त्यांना नेमके काय होते?

हेही वाचा – Gautami Patil: गौतमी पाटीलच्या डान्ससोबतच डिझायनर ब्लाऊजचीही विशेष चर्चा! गोविंदांना दिला खास संदेश; पाहा VIDEO

मीम्स, एआय आणि कलाकारांच्या प्रतिक्रियेवर भाष्य
सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स आणि एआय व्हिडीओबाबत बोलताना बापट यांनी सांगितले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोक काहीही बनवू शकतात. ते स्वतः फक्त WhatsApp वापरतात आणि सर्व मीम्स पाहणे त्यांना शक्य होत नाही. गायक अवधूत गुप्ते यांनी त्यांच्यावर बनवलेल्या गाण्याबाबत विचारले असता, बापट म्हणाले की कलाकार त्यांचे काम करत राहतील. चित्रकार चित्रे काढतील आणि इतर कलाकार त्यांच्या परीने व्यक्त होतील, परंतु आपण या सर्व गोष्टींपेक्षा मूळ मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे मानतो.

राजकीय टीकेला चोख प्रत्युत्तर
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी 'रत्नागिरीवरून येऊन पुणेकरांना गणेशोत्सव शिकवू नका' अशी टीका केली होती. याला उत्तर देताना बापट म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणारे लोकमान्य टिळक हेसुद्धा मूळचे रत्नागिरीचेच होते. त्यामुळे अशी टीका पूर्णपणे तार्किकदृष्ट्या चुकीची आणि पायाहीन आहे. याशिवाय आमदार रवींद्र धंगेकर यांच्या आरोपांचा खंडन करताना त्यांनी स्पष्ट केले की, वारी किंवा कोणतेही धार्मिक उत्सव बंद करण्याची त्यांची मागणी नाही. सण साजरी करताना नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचे कालसुसंगत बदल व्हावेत, हीच त्यांची एकमेव भूमिका आहे.

हेही वाचा – Raigad Dahi Hand: रायगडची सर्वात हटके दहीहंडी! विहिरीवरून उंच उडी घेत गोविंदांचा थरार, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number