Vidhanbhavan Bomb Threat : मोठी बातमी! विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल, पोलिसांचा तपास सुरू

धमकीचा ईमेल आल्यावर पोलिसांची कसून शोध मोहीम सुरू झाली

Vidhanbhavan Bomb Threat  : मोठी बातमी! विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल, पोलिसांचा तपास सुरू

विधान भवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या कारणामुळे विधानभवनातून सर्वांना बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा ईमेल आल्यावर पोलिसांची कसून शोध मोहीम सुरू झाली आहे. विधीमंडळात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल समोर आल्याने  एकच खळबळ उडाली आहे. 

सध्या विधानभवनातील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलं आहे. सर्च ऑपरेशन होईपर्यंत कोणालाच आत सोडले जाणार नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि व्हीआयपी या परिसरात येत असतात. त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number