मुंबई : विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्य तर पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव अशा एकूण दहा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेच्या या नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यामध्येही भाजपच्या आमदारांचे संख्याबळ दिसून आले. भाजपच्या सहा, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि शिवसेना ठाकरे गटाचे एक अशा दहा आमदारांना शपथ देण्यात आली. यामध्ये प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, डॉ. नीलम गोऱ्हे व बच्चू कडू, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, झिशान सिद्दिकी यांचा समावेश आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होते.
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांची यादी –
प्रमोद जठार- भाजप
सुनील कर्जतकर- भाजप
माधवी नाईक- भाजप
संजय भेंडे- भाजप
विवेक कोल्हे- भाजप
प्रज्ञा सातव- भाजप
डॉ. नीलम गोऱ्हे- शिवसेना शिंदे गट
बच्चू कडू- शिवसेना शिंदे गट
झिशान सिद्दिकी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
अंबादास दानवे- शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी)