राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. मात्र मतदानाची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच महायुतीने मोठी राजकीय चाल खेळत सहा जागांवर आपले उमेदवार बिनविरोध विजयी करून घेतले आहेत. या यशामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीत आनंदाचे वातावरण आहे.
उर्वरित जागांसाठी आज सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 22 जून रोजी करण्यात येणार आहे.
कोणते मतदार संघ
नाशिक, जळगाव, सातारा- सांगली, नांदेड, सोलापूर, भंडारा – गोंदिया, अमरावती, धाराशिव- लातूर-बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर-जालना, नागपूर.
हेही वाचा – Shivsena Operation Tiger : ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी! 19 तारखेला करणार महत्त्वाची घोषणा; काय आहे नवी अपडेट?
बिनविरोध निवड झालेले आमदार
रवींद्र फाटक (ठाणे), अनिकेत तटकरे (कोकण), विक्रम काकडे (पुणे), प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ) आणि अरुण लखाणी (वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर)