सोमवारी निवडणूक आयोगाने प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी निवडणूका जाहीर केल्या. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करताना गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे निवडणुका व्यवस्थित पार पडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. निवडणुकांदरम्यान आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी आयोगाने एक परिपत्रक सोमवारी जारी केले.
जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक प्राधिकरण मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये ही आचारसंहिता कठोरपणे लागू असेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे मतदारांना हॉटेल्स, रिसॉर्ट्स किंवा तत्सम ठिकाणी ठेवण्याच्या गैरप्रकारावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र या नियमाचे उल्लंघन केल्यास या प्रकाराला लाच समजून भारतीय दंड संहितेच्या कलम 171 ब अंतर्गत गुन्हा मानला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्याने याबरोबरच मंत्र्यांच्या दौऱ्यांवरदेखील निर्बंध घातले गेले आहेत. निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय किंवा राज्यमंत्री (मुख्यमंत्री यांच्यासह) अधिकृत दौरा करू शकतात. अधिकृत दौऱ्यांमध्ये निवडणुकीशी संबंधित कामे किंवा दौरे समाविष्ट करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे मतदारांना प्रभावित करेल अशी कोणतीही नवीन धोरणात्मक घोषणा किंवा कार्यक्रम जाहीर करता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आणि गाड्यांचा वापर मर्यादित करावा लागणार आहे.
The Election Commission has announced the schedule for the biennial elections to 16 seats of the Maharashtra Legislative Council (MLC). pic.twitter.com/FVPKoBpI6t — ANI (@ANI) May 18, 2026
तसेच स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत महापौर, नगरपरिषद अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना त्यांच्या अधिकृत शासकीय गाड्यांचा वापर केवळ कार्यालयातून घरापर्यंत आणि घरापासून कार्यालयापर्यंतच करता येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.