मुसळधार पावसाने राज्यात थैमान घातले असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ येथील अमरावतीत संत्रा उत्पादकांवर मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 8 दिवसांपासून विदर्भात संततधार पाऊस पडत असून संत्र्याच्या बागांना मोठे नुकसान झाले आहे. अमरावतीमधील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे भागात संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहे.
विदर्भाची शान म्हणून ओळखली जाणारी संत्रांचे अमरावतीत मोठे नुकसान झाले आहे.
अमरावतीमधील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे भागातील संत्रा उत्पादकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.
विदर्भात संत्र्यांच्या बागांची मोठी गळती सुरू असून शेतकरी चिंतेत आले आहे.
संत्र्यांच्या लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नसल्याचे शेतकरी म्हणाले आहेत.
त्यामुळे संत्री उत्पादक हवालदिल झाले असल्याचे म्हटलं आहे.