जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड.

मुंबई, १५ जुलै २०२३,प्रतिनिधी – मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून राज्य करणारे, सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. यामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. १९७० ते १९९० या काळात चित्रपटसृष्टी गाजवणारे रवींद्र महाजनी यांचं अल्पशा आजाराने निधन झाल आहे. मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख […]

जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड.

मुंबई, १५ जुलै २०२३,प्रतिनिधी – मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून राज्य करणारे, सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. यामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

१९७० ते १९९० या काळात चित्रपटसृष्टी गाजवणारे रवींद्र महाजनी यांचं अल्पशा आजाराने निधन झाल आहे. मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. ते ७७ वर्षांचे होते. महाजनी यांनी त्यांच्या तरुणाईत मुंबईमध्ये टॅक्सी चालक म्हणून देखील काम केलं आहे. व्ही शांताराम यांच्या झुंज चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनतर मात्र आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी खूप गाजवली. मुंबईचा फौजदार, देवता, ह्या चित्रपटांमध्ये केलेल्या अभियानाने त्यांनी चाहत्यांच्या मनात आपुलकी आणि प्रेम निर्माण केलं.

फ्लॅटमध्ये गेले असता पोलिसांनना एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पडताळणी केली असता तो मृतदेह प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा असल्याचं आढळून आलं. महाजनी यांचा मृत्यू 2 ते 3 दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज तळेगांव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महाजनी यांचं कुंटुंब मुंबईत राहायला आहे. अभिनेता गश्मीर महाजनीला वडिलांची निधनाची बातमी कळविण्यात आली. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुंटुंबाकडे सोपविण्यात आला. मुंबईतील वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number