पुणे : शिवसेना ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘मलाही शिंदेंच्या शिवसेनेची ऑफर आली होती’, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. “सध्या फक्त ऑपरेशनचीच चर्चा आहे. हे सगळे ऑपरेशन करता करता महाराष्ट्र आयसीयूमध्ये पोहोचला आहे, तरी या लोकांचं लक्षच नाहीये. या सर्व लोकांचं फक्त ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन 3.0 असं सगळं सुरू आहे. पण दुसरीकडे महाराष्ट्र व्हेंटिलेटरवर गेला, यावर सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही. पुणे शहरात एवढे भाजपाचे नगरसेवक असतानाही एका-एका नगरसेवकालाही फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत”, असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. कही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीदेखील शिवसेनेतून विधान परिषद उपसभापदी पदाचा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टागरची चर्चा आणखीनच जोर धरू लागली आहे.