मराठा आरक्षणासाठी वनवास याञा

मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर ते मंत्रालय अशी वनवास यात्रा काढण्यात येत आहे. शनिवारपासून या वनवास यात्रेला तुळजापुरातून प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. आई तुळजाभवनीचा जागर करून […]

मराठा आरक्षणासाठी वनवास याञा

मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर ते मंत्रालय अशी वनवास यात्रा काढण्यात येत आहे. शनिवारपासून या वनवास यात्रेला तुळजापुरातून प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. आई तुळजाभवनीचा जागर करून तुळजापूरातून या वनवास यात्रेला प्रारंभ झाला. मराठा समाजाचे योगेश केदार यांच्या नेतृत्वाखाली वनवास यात्रा काढण्यात आली. यावेळी यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आरक्षण आमचे हक्काचे, आरक्षण द्या अन्यथा खूर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी केली. वनवास यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून येत्या ६ जून रोजी ही वनवास यात्रा मंत्रालयात धडकणार आहे.

दरम्यान, वनवास यात्रेला मराठा क्रांती ठोक मोर्चाने विरोध दर्शवला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत वनवास यात्रेचा निषेध नोंदवला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, पोलिसांनी याप्रकरणी मध्यस्थी करत वनवास यात्रेला विरोध करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number