नाशिक मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मराठवाडा, विदर्भासह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. १५ मार्च रोजी दुपारपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. रात्रीच्या सुमारास काही भागांना वीजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलं. मागील अवकाळीच्या फटक्यातून अद्याप न सावरलेल्या बळीराजावर हे दुसरं एक संकट कोसळलं आहे. पुढचे दोन दिवस […]

नाशिक मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मराठवाडा, विदर्भासह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. १५ मार्च रोजी दुपारपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. रात्रीच्या सुमारास काही भागांना वीजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलं. मागील अवकाळीच्या फटक्यातून अद्याप न सावरलेल्या बळीराजावर हे दुसरं एक संकट कोसळलं आहे. पुढचे दोन दिवस राज्यातील वातावरण ढगाळ राहून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नाशिक मध्ये रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आधीच अडचणीत आलेला बळीराजा आणखी अडचणीत सापडला आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अद्यापही झालेले नसताना आता पुन्हा एकदा या अवकाळी पावसाने बळीराजाला जोडपून काढला आहे. अचानक झालेल्या या अवकाळी मुळे कांदा कोबी द्राक्ष भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number