Nitin Gadkari : ‘राजकारणात 90 टक्के खेळाडू…’ पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना नितीन गडकरी यांनी सुनावलं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर अमरावतीच्या एका कार्यक्रमात जोरदार टीका केली आहे.  

Nitin Gadkari : ‘राजकारणात 90 टक्के खेळाडू…’ पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना नितीन गडकरी यांनी सुनावलं

अमरावती श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची मोठी उपस्थिती लाभली होती.

अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई होते, तर विशेष अतिथी म्हणून ना. नितीन गडकरी, ना. डॉ. पंकज भोयर, महापौर श्रीचंद तेजवाणी उपस्थित होते. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असताना नितीन गडकरींनी नेत्यांचे कान पिळले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर अमरावतीच्या एका कार्यक्रमात जोरदार टीका केली आहे.  

हेही वाचा- Beed : परस्पर खोट्या तक्रारी? बीडमधील ‘त्या’ प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा; कारवाईचा इशारा

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, “राजकारणात 90 टक्के खेळाडू वाट पाहतात सरकार कोणतं येईल. त्यांचे झेंडे, हार तयारच राहतात, पक्ष का सोडला कळत नाही. त्यांना पक्षात का घेतलं, हे घेणाऱ्यांनाही कळत नाही. राजकारणात तत्व, निष्ठा, कमी झाली आहे. मी कधी विचारांशी तडजोड करत नाही. जातीपातीचं राजकारण करत नाही. युध्दात कोणी हरला तर समाप्त होत नाही पण युद्धभूमी सोडून पळाल तर समाप्त झाल्याशिवाय राहत नाही…” अशा परखड शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्यांचे कान टोचले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number