नाशिकच्या निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या ट्रक मध्ये वीज प्रवाह उतरल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेणखताची वाहतूक करताना लोंबकळलेल्या वीजवाहक तारेचा ट्रकला धक्का बसला. त्यामुळे ट्रकमध्ये वीज प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
ही घटना निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत जवळील पालखेड ते डावसवाडी शिव रस्त्यावर घडली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणकडे तक्रार करून देखील लोंबणाऱ्या विजेच्या तारांचा व्यवस्थित बंदोबस्त न केल्यामुळे सदर घटना घडली आहे. अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे, त्याचवेळी तारांचा बंदोबस्त केला असता, तर आज दोन माणसांचा मृत्यू झाला नसता. तरी या शिवरस्त्यालगत अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबत असून आता तरी महावितरणाने या तारावर घ्याव्या अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थ करीत आहे.