चंद्रकांत पाटलांना उद्धव यांचं प्रत्त्युत्तर

बाबरी पाडण्याबाबत सेनाभवनात कोणतीही योजाना आखली नाही, तर बाबरी पाडताना बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक तेथे नव्हते, असे वक्तव्य भाजपा नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, […]

चंद्रकांत पाटलांना उद्धव यांचं प्रत्त्युत्तर

बाबरी पाडण्याबाबत सेनाभवनात कोणतीही योजाना आखली नाही, तर बाबरी पाडताना बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक तेथे नव्हते, असे वक्तव्य भाजपा नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडले आहेत. बाबरी पाडण्याच्या वेळी सर्व उंदीर बिळात लपले होते. आणि आता बाबरीच्या आठवणीतील खंदकातील अनेक उंदीर बाहेर पडायला लागले आहेत. बाबरी पाडण्याच्या वेळी देशाचे पंतप्रधान बांग्लादेश दौऱ्यावर होते. कदाचित हिमालयातही असतील, पण त्यांचं नाव आलं नाही, असे उद्धव म्हणाले.

बाळासाहेबांचा अपमान आजवर कुणी केला नव्हता. भाजपा शिवसेनेवर अन्याय करत आहे. जर हे लोक भाजपासोबत राहणार असतील तर त्यांनी शिवसेनेचे नाव घ्यायचे नाही. बाळासाहेबांचं नाव घ्यायचं नाही. त्यांचा फोटो लावयचा नाही. धनुष्यबाण चिन्ह वापरायचे नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा अन्यथा..’

बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता. मात्र, एकही शिवसैनिक तेथे नव्हता, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून राजकीय वातावरण तापले असून उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. भाजपाकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळीदेखील शिवसैनिक रस्त्यावर उतरले. एकिकडे मोहन भागवत मशिदीत जातात, तर कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. गोमुत्रधारी हिंदुत्व देशाच्या कामाचं नाही, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा नको तर हकालपट्टी करावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचा दावा काय?

अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली आहे. त्यावेळी तेथे शिवसेनेचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. उद्धव गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत बाबरी पाडल्याबाबत नेहमीच बोलतात, मात्र, प्रश्न असा आहे की, त्यावेळी ते अयोध्येत होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

पाहा, उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद : 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number