उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जमलेल्या शिवसैनिकांना ओपन जीपमधून संबोधित केलं. धनुष्यबाण चोरलंय ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन लढा देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. चोरबाजाराचे मालक धनुष्यबाण पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रथमच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंत्रणांचा […]

उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जमलेल्या शिवसैनिकांना ओपन जीपमधून संबोधित केलं. धनुष्यबाण चोरलंय ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन लढा देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. चोरबाजाराचे मालक धनुष्यबाण पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी प्रथमच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंत्रणांचा वापर करुन पक्ष संपवता येतात असं वाटत असतील तर त्यांना सांगतो शिवसेना संपवता येणार नाही. बाळासाहेबांचा मुखवटा घालून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतंय ही आपली ताकद आहे.

मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण चिडलेले आहात. देशातील असा कोणताही पक्ष नसेल ज्यावर असा आघात झालेला आहे.त्यांना सांगतो शिवसेना संपवता येणार नाही. तुमच्या किती पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, पक्ष पाहिजे. शिवसेनेचं कुटुंब त्यांना नकोय. ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपलं धनुष्य बाण चोरांना दिला गेला. ज्या पद्धतीनं हे कपटानं राजकारण करतात त्या पद्धतीनं मशाल चिन्ह देखील घालवतील. पण, धनुष्यबाण चोरलंय त्यांना सांगतो तुमच्यापुढं मशाल चिन्ह घेऊन लढून दाखवतो.चोरांना निवडणुकीत धडा शिकवणार असही उद्धव ठाकरे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number