‘सत्तेत येताच महायुतीचे निर्णय रद्द करू’

मागील काही दिवसांत महायुतीने १६०० निर्णय घेतले. थोडं थांबा, आमचं सरकार येणार आहे. सत्तेत येताच महायुती सरकारचे निर्णय रद्द करणार आहोत, अशी घोषणा उद्धव यांनी केली.

‘सत्तेत येताच महायुतीचे निर्णय रद्द करू’

मुंबई : मागील काही दिवसांत महायुतीने १६०० निर्णय घेतले. थोडं थांबा, आमचं सरकार येणार आहे. सत्तेत येताच महायुती सरकारचे निर्णय रद्द करणार आहोत, अशी घोषणा उद्धव यांनी केली. ते दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत बोलत होते. उद्धव यांनी त्यांच्या भाषणातून महायुतीवर टीका केली. सर्वोच्च न्यायालय विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी शिवसेना कोणाची या प्रकरणी निकाल देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्यांना मोठं केलं त्यांनी विश्वासघात केला असे उद्धव म्हणाले. शेतीतले कळत नसले तरी शेतकऱ्यांचे दुःख कळते असेही ते म्हणाले. मुंबई विकली जातेय, मी मुंबईसाठी लढतोय. सत्तेत येताच शिंदे सरकारचे बहुतांश निर्णय रद्द करू असे उद्धव म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number