सध्या राज्यभरात गाजलेला विषय म्हणजे ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. अशातच डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मातोश्रीवर शुक्रवारी दुपारी 12 वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सुरुवातीला याठिकाणी संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत.
त्यानंतर या ठिकाणी संघटनात्मक बांधणी नव्याने केली जाणार आहे. त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मतदारसंघ बांधणीसाठी गेम प्लॅन आखला जाणार आहे. या पुढील काळात बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला जाणार आहे. त्यासोबतच आगामी काळात या मतदारसंघाच्या बाबतीत रणनीती आखली जाणार आहे. त्यामध्ये मोठा निर्णय घेणार असल्याने बंडखोर खासदारांची धडधड वाढली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे ऍक्शनमोडवर आले आहेत.