‘घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार’

उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावातील पाचोरा जिल्ह्यात जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना कोणाची याबाबत उद्धव यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. तसेच भाषणातून उद्धव यांनी शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टोला लगावला आहे. पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. सभेत […]

‘घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार’

उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावातील पाचोरा जिल्ह्यात जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना कोणाची याबाबत उद्धव यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. तसेच भाषणातून उद्धव यांनी शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टोला लगावला आहे.

पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. सभेत घुसणाऱ्या घुशी खूप झाल्या आहेत. घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला आव्हान देऊ नये, असेही उद्धव म्हणाले.

तसेच, शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तरीही ते सांगतील. परंतु, निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोगाचा धृतराष्ट्र झाला असेल, पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number