मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कात पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात सत्ताधारी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
अनेक पक्षांच शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. पळवलं ते फिकट होतं. सोनं माझ्याकडेच आहे. गाढवावर कितीही शाली टाका, गाढव ते गाढवंच…अमित शाहांचे जोडे वाहणारे गाढवचं. हा सभा कसा घेणार असे विचारले, आजपर्यंत झाले त्यापेक्षा मोठा घेणार. सकळीकडे चिखल झालायं..त्याच कारण कमळाबाई.. त्यांनी स्वतःची कमळं फुलवून घेतील पण जनतेचा चिखल करून टाकला…शेतकऱ्याची शेतजमीन तर वाहून गेलीच पण घरादाराची माती झाली. अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नाही. सगळ्यांना आवाहन करतोय. संकट मोठ आहे.
फुल न फुलाची पाकळी काही न काही त्या शेतकऱ्यांसाठी करू. मुख्यमंत्री बोलत आहेत.. ओला दुष्काळ नाही. सगळे निकष बाजूला ठेवा.. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी द्या. तुम्ही कर्जमुक्ती करा… २०१७ च्या कर्जमुक्तीची शेतकरी अजूनही वाट बघत आहेत. आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. संघाच्या दसरा मेळाव्यावर बोलणार आहे. संघाची १०० वर्ष पूर्ण आणि गांधी जयंती हा योगायोग आला आहे.
कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा विधायक आणला. त्याला आपण विरोध केला. त्याला सरकारनं कडवे डावे संबोधलं. आम्ही कडवे डावे ओळखत नाही, आम्ही देशद्रोही फक्त ओळखतो. लेह लडाखला न्यायहक्क मिळालाच पाहिजे यासाठी सोनम वायचुंगनं उपोषण केलं. मात्र मोदींनी त्यांना उचललं आणि तुरुंगांत टाकलं. मोदींची स्तूती करत होते तोपर्यंत वायचुंग देशद्रोही नव्हते. पण न्यायहक्क मागितला म्हणून ते देशद्रोही झाले.