Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे मैदानात? ‘बॉस इज ऑलवेज राईट…’ म्हणत मिलिंद नार्वेकरांनी गुपित उलघडलं

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'वेट अँड वॉच'चा खेळ शिगेला पोहोचला आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपने त्यांचे पाच शिलेदार मैदानात उतरवून आघाडी घेतली असली, तरी महाविकास आघाडीचा 'तो' एकमेव चेहरा कोण? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे 'चाणक्य' मानले जाणारे […]

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे मैदानात? ‘बॉस इज ऑलवेज राईट…’ म्हणत मिलिंद नार्वेकरांनी गुपित उलघडलं

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'वेट अँड वॉच'चा खेळ शिगेला पोहोचला आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपने त्यांचे पाच शिलेदार मैदानात उतरवून आघाडी घेतली असली, तरी महाविकास आघाडीचा 'तो' एकमेव चेहरा कोण? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे 'चाणक्य' मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय हवा पार बदलून गेली आहे. नार्वेकरांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याच उमेदवारीकडे बोट दाखवत निर्देश केल्याने, आता मविआचा सस्पेन्स संपून चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यातील सध्याचे संख्याबळ पाहता, 9 जागांपैकी भाजप 5, शिवसेना (शिंदे गट) 2, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 1 आणि महाविकास आघाडी 1 अशा जागांचे गणित स्पष्ट आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत 'स्ट्राइक रेट' वाढवला असला, तरी महाविकास आघाडीच्या गोटात मात्र कमालीची शांतता होती. अशातच मिलिंद नार्वेकर यांनी, "पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच उमेदवार असतील याची 99 टक्के खात्री आहे," असे सांगून खळबळ उडवून दिली. उरलेल्या एक टक्क्याबद्दल बोलताना "ठाकरे असल्याने काहीही सांगता येत नाही, पण 'बॉस इज ऑलवेज राईट' हे विसरून चालणार नाही," असे विधान करत त्यांनी चेंडू पुन्हा ठाकरेंच्या कोर्टात ढकलला आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधान परिषदेची निवडणूक लढवावी, असा सूर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येही उमटत आहे. जर खुद्द उद्धव ठाकरे रिंगणात उतरले, तर ही निवडणूक केवळ तांत्रिक उरून त्याला एक मोठे राजकीय वजन प्राप्त होणार आहे. मात्र, जर ठाकरेंनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तर काँग्रेस या जागेवर आपला हक्क सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच, 'मातोश्री'वरून निघणाऱ्या आदेशाकडे केवळ शिवसैनिकच नव्हे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही डोळे लावून बसले आहेत.

हेही वाचा: Riyan Parag: हातात ती गोष्ट, तोंडातून धुर…, सामन्यादरम्यान राजस्थानच्या कॅप्टन काय करत होता? आक्षेप घेत नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, आता काय कारवाई होणार?

राजकारणात 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या उक्तीप्रमाणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना रंगणार आहे. जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील, तर महायुती ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार की पुन्हा एकदा एखादा पेच निर्माण करून 'घोडेबाजारा'ला वाव देणार, हा कळीचा मुद्दा आहे. भाजपने अनुभवी नेत्यांना संधी देऊन त्यांची बाजू भक्कम केली आहे. अशा वेळी मविआकडून उद्धव ठाकरे यांच्यासारखा चेहरा समोर आल्यास लढत 'काटे की टक्कर' ठरेल, यात शंका नाही.

अर्ज भरण्यासाठी आता घड्याळाचे काटे वेगाने फिरत आहेत. मिलिंद नार्वेकरांच्या विधानानंतर आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे मानले जात असले, तरी राजकारणात 'काहीही होऊ शकते' हा नियम विसरून चालणार नाही. उद्धव ठाकरे स्वतःची उमेदवारी जाहीर करून मविआला एकसंध ठेवणार की दुसरा एखादा अनपेक्षित पत्ता बाहेर काढून सर्वांना धक्का देणार? याचे उत्तर पुढच्या 48 तासांत अवघ्या महाराष्ट्रासमोर येईल. तूर्तास, नार्वेकरांच्या '99 टक्क्यांनी' मात्र राजकीय चर्चांना जोरदार फोडणी दिली आहे. 

हेही वाचा: Weather Update : महाराष्ट्र ‘हिट वेव्ह’नं हैराण, तरीही काही जिल्ह्यांवर वादळी वाऱ्याचं संकट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number