Uddhav Thackeray MLA: खासदारांनंतर आता आमदारही?, उद्धव ठाकरेंनी बोलावल्या बैठकीला चार आमदारांची दांडी, राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट

या बैठकीला पक्षाचे चार आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे

Uddhav Thackeray MLA: खासदारांनंतर आता आमदारही?, उद्धव ठाकरेंनी बोलावल्या बैठकीला चार आमदारांची दांडी, राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी शिवालय येथे पार पडली. आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक विषय तसेच विधिमंडळातील रणनीती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीला पक्षाचे चार आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमदार संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गैरहजर आमदारांनी बैठकीला उपस्थित राहणे शक्य नसल्याची माहिती पक्ष नेतृत्वाला आगाऊ दिली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक रणनीतीवर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

हेही वाचा – Sanjay Raut Tweet: बंडखोर मुंबईत दाखल होताच संजय राऊतांची ‘गद्दार’ म्हणत जहरी टीका, ट्विटमध्ये लिहिलं,’50-50 कोटीला विकले गेलेले…’ 

चार आमदारांच्या अनुपस्थितीमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number