Uddhav thackeray : "आजचा दिवस माझा नाही, पण…" पक्षफुटीबाबत उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन; पहिली प्रतिक्रिया समोर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Uddhav thackeray : &quotआजचा दिवस माझा नाही, पण…&quot पक्षफुटीबाबत उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन; पहिली प्रतिक्रिया समोर

'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर 14 जून रोजी दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण कालच्या बैठकीला 9 पैका 7 खासदार उपस्थित असल्याची चर्चा सुरु होती.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले आहेत, परंतु त्यापैकी 7 खासदार हे सातत्याने सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा राजकीय गोटातून केला जात आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच पक्षफुटीबाबत दिल्लीमध्ये मोठ्या हलाचाली वाढल्या आहेत.

हेही वाचा- Maharashtra Monsoon Session 2026: मोठी बातमी, पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित; अनेक मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये होणार जोरदार चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. अशातच संजय राऊत दिल्लीला निघाले आहेत. मात्र सध्याच्या घडामोडी पाहता संजय राऊत दिल्ली दौऱ्याला जात असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर चर्चा संदर्भात पक्षाकडून काही हालचाली घडणार का याकडे लक्ष आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही, पण उद्या नक्की माझा दिवस येईल. बाळासाहेबांची शिवसेना सोडणाऱ्यांना पश्चाताप होईल. पश्चाताप होईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. कार्यकर्त्यांनी संयम आणि सहनशीलता ठेवायला शिका." याचसोबत त्यांनी 2022 मधील शिवसेना फुटीवेळचे काही अनुभव खासदारांसमोर मांडले. 
तर दुसरीकडे ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदेंच्या पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number