मोठी बातमी! खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना वेग

शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून नागपूरला प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मोठी बातमी! खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना वेग

राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे वातावरण चांगलेच तापले असताना आता आणखी एका घडामोडीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. पक्षातील अनेक खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींना राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देण्यात आले असून, त्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.

हेही वाचा: Divyang Sahayak Portal: आता सर्व सरकारी योजना एकाच क्लिकवर; दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

दरम्यान, या सर्व घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातून एकत्र प्रवास करताना दिसले. विशेष म्हणजे, विमानतळावर आणि विमानात दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करत संवादही साधल्याचे समोर आले आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या भेटीने राजकीय चर्चांना नव्याने चालना मिळाली आहे. विशेषतः ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका होत असताना भाजपवर तुलनेने कमी आक्रमक भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. त्यातच आता फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा: Devendra Fadanvis : ठाकरेंच्या त्या बंडखोर खासदारांना भाजपात यायचं होतं? फडणवीसांनी थेट हातच जोडले

राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अशा घडामोडींकडे केवळ योगायोग म्हणून पाहता येणार नाही. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

एकीकडे खासदारांच्या बंडामुळे ठाकरे गटासमोर नवे आव्हान उभे राहिले असताना, दुसरीकडे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने आगामी राजकीय घडामोडींविषयी विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number