उदयनराजेंच्या वक्तव्यानं नव्या वाद?

मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असे खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

उदयनराजेंच्या वक्तव्यानं नव्या वाद?

मुंबई : मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असे खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी केले आहे. फुले वाड्यात अभिवादनावेळी उदयनराजे यांनी वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. उदयनराजेंच्या वक्तव्याने ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 

फुले वाड्यात आज महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. खासदार तथा भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले. यावेळी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली असं वक्तव्य  खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. उदयनराजे यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे. फुलेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच पूर्वजांचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

हेही वाचा : ई-मंत्रिमंडळ – कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल

खासदार उदयनराजे यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी उदयनराजे यांचं वक्तव्य तीन- चार वेळेस ऐकलं. महात्मा फुलेंच महत्व कळल्याने उदयनराजे हे फुले वाड्यावर आले आहेत अस वाटलं. पण इथे येऊन जयंतीच्या दिवशी फुलेंच महत्व कमी करायचं आणि त्यांच्या पूर्वजांचं महत्व वाढवल असल्याचे म्हणत ससाणे यांनी उदयनराजेंचा समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना अवघा महाराष्ट्र जाणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. संभाजी महाराज यांनी म्हटलं वाघ्या कुत्रा कसा आला? त्यांनी यावर हरकत घेतली. महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली मुलींची  पहिली शाळा सुरू केली. यावर उदयन राजे यांचा आक्षेप आहे. त्यांनी नवा शोध लावला आहे असे म्हणत ससाणे यांनी उदयनराजे यांची फिरकी घेतली आहे. 

उदयनराजे यांनी जे वक्तव्य केले. प्रतापसिंह यांनी जी पहिली शाळा सुरू केली. शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? त्यांचं काय झालं? परत शाळा का सुरू राहिली नाही? त्यानंतर पुढच्या वंशजांनी आणि उदयनराजे यांनी सुद्धा शैक्षणिक वारसा पुढे का घेऊन गेले नाहीत? असा सवाल ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी उदयनराजेंना केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number