भाजपात सर्वच मित्र; उदयनराजे यांचा भाजपात प्रवेश करण्याचे संकेत

विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपात इनकमिंग सुरू असून राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत. त्याचबरोबर उदयराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्यानंतर उदयनराजे भाजपात प्रवेश करण्याचे संकेत देत असल्याचे म्हटलं जात आहे. त्याचबरोबर […]

भाजपात सर्वच मित्र; उदयनराजे यांचा भाजपात प्रवेश करण्याचे संकेत

विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपात इनकमिंग सुरू असून राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत. त्याचबरोबर उदयराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्यानंतर उदयनराजे भाजपात प्रवेश करण्याचे संकेत देत असल्याचे म्हटलं जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या काळात जी कामे झाली नाही ती भाजपा सरकारने केल्याचे उदयनराजे म्हणाले आहेत.

काय म्हणाले उदयनराजे भोसले ?

भाजपात राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रवेश केल्यानंतर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करतील का ? असा प्रश्न सगळ्यांना उपस्थित झाला आहे.

मात्र उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीनंतर राजकीय वर्तुळात ही चर्चा चांगलीच रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या काळात जी कामं पूर्ण झाली नाहीत ती कामं भाजपा सरकारने पार पाडल्याचे उदयनराजे म्हणाले.

भाजपामधील सगळ्याच नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचे उदयनराजे म्हणाले.

तसेच काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले शिवेंद्रराजे धाकटे भाऊ असून त्यांनी केली तरी विसरुन जाऊ असेही उदयनराजे म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number