राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चीत

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. आज स्वत: उदयनराजेंनी टविट् करत या चर्चेला पुर्णविराम लावला आहे. त्यांनी अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. तसं ट्विट उदयनराजे यांनी केलं आहे. उदयनराजेंचे ट्विट उदयनराजे भोसले भाजपामध्ये प्रवेश करणार की नाही या प्रश्नाचे उत्तर स्वत: उदयनराजेंनी दिलं […]

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चीत

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. आज स्वत: उदयनराजेंनी टविट् करत या चर्चेला पुर्णविराम लावला आहे. त्यांनी अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. तसं ट्विट उदयनराजे यांनी केलं आहे.

उदयनराजेंचे ट्विट

उदयनराजे भोसले भाजपामध्ये प्रवेश करणार की नाही या प्रश्नाचे उत्तर स्वत: उदयनराजेंनी दिलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी ही माहिती दिली आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 14 सप्टेंबरला भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

“आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”,असं त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. त्यांनी या ट्वीटर पोस्टमध्ये एक पोस्टर शेअर केलं आहे.

भाजपा प्रवेशानंतर ते 15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत. शरद पवार, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number