दोन संशयितांनी विचारला मुकेश अंबानीच्या ‘अँटिलिया’चा पत्ता

  उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाची आज दोन संशितांकडून विचारणा करण्यात आली. या दोन संशयितांनी एका टॅक्सीचालकाला अँटिलियाचा पत्ता विचारला असल्याची माहिती टॅक्सीचालकाने मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यामुळे मुकेश अंबांनी यांच्या अँटिलिया घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. टॅक्सीचालकाने पोलिसांकडे जबाब नोंदविल्यामुळे त्या दोन संशयितांचा शोध पोलीस करत आहेत. तसेच संशयितांकडून बोगस गाडीक्रमांकाचा वापर झाल्याचे […]

दोन संशयितांनी विचारला मुकेश अंबानीच्या ‘अँटिलिया’चा पत्ता

  उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाची आज दोन संशितांकडून विचारणा करण्यात आली. या दोन संशयितांनी एका टॅक्सीचालकाला अँटिलियाचा पत्ता विचारला असल्याची माहिती टॅक्सीचालकाने मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यामुळे मुकेश अंबांनी यांच्या अँटिलिया घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. टॅक्सीचालकाने पोलिसांकडे जबाब नोंदविल्यामुळे त्या दोन संशयितांचा शोध पोलीस करत आहेत. तसेच संशयितांकडून बोगस गाडीक्रमांकाचा वापर झाल्याचे समोर आले आहे.

  दोन व्यक्तींनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराचा पत्ता विचारल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन त्या परिसरात सुरक्षा वाढवली असून त्या परिसरात नाकेबंधी करण्यात आली आहे. या आधी अँटिलियाच्या बाहरे स्फोटके ठेवण्यात आली आणि आता दोन संशयितांकडून मुकेश अंबानीच्या अँटिलिया घराच्या पत्त्याची विचारपूस करण्यात आली त्यामुळे पोलिसांनी या गोष्टीची दखल घेतली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number